मुंबईच्या प्रशिक्षकपदी ‘या’ माजी क्रिकेटपटूची निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबई क्रिकेट असोसिएशनने माजी क्रिकेटपटू अमोल मुझुमदार याची मुंबईच्या प्रशिक्षकपदी निवड केली आहे. अमोल मुझुमदारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 11 हजारपेक्षा जास्त रन केले आहेत. तसेच त्याला आंतरराष्ट्रीय टीमसोबत काम करण्याचाही अनुभव आहे. मुंबईच्या प्रशिक्षकाच्या रेसमध्ये वसीम जाफर यांच्या नावाचाही समावेश होता. विनोद कांबळी, निलेश कुलकर्णी आणि जतीन परांजपे यांच्या समितीने प्रशिक्षक पदासाठी उत्सुक असलेल्या सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी भारताचे माजी ऑलराऊंडर बलविंदर सिंग संधू, भारताचे माजी लेग स्पिनर साईराज बहुतुले आणि मुंबईचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनीदेखील या पदासाठी अर्ज केला आहे.

मुंबईचा माजी कर्णधार असलेल्या अमोल मुझुमदारच्या नेतृत्वात मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली होती. तसेच अमोल मुझुमदार यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, नेदरलँड्सची टीम आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीमसोबत तो बॅटिंग प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. याशिवाय अमोल मुझुमदार कॉमेंट्रीदेखील करतो. अमोल मुझुमदार यांच्या अगोदर मुंबईच्या प्रशिक्षकपदी अमित पागनिस यांची नियुक्ती केली होती. पण टीमच्या खराब कामगिरीनंतर त्यांना प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये रमेश पोवार यांची मुंबईच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. आणि मुंबई रणजी ट्रॉफी जिंकून चॅम्पियन बनली. यानंतर आता रमेश पोवार यांची महिला टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अमोल मुझुमदार यांची कारकीर्द
अमोल मुजुमदार यांनी मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 1993-94 सालच्या पहिल्याच सामन्यात त्याने 260 रनची खेळी केली होती. त्यांचा हा विक्रम 2018 पर्यंत कायम होता. अमोल मुझुमदारने आपल्या कारकिर्दीत 171 सामन्यांमध्ये 48 च्या सरासरीने 11,167 रन केले आहेत. पदार्पणाच्या सामन्यात केलेली 260 रनची खेळी त्याच्या करियरमधली सगळ्यात मोठी खेळी होती. अमोल मुझुमदारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 30 शतके आणि 60 अर्धशतके केली आहेत पण दुर्दैवाने त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. अमोल मुझुमदार मुंबईशिवाय आसाम आणि आंध्र प्रदेशकडूनसुद्धा खेळले आहेत.

Leave a Comment