ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या बाईकस्वारांना ट्रकची धडक, दोघांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये बाईक आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार ते परतवाडा मार्गावरील कुरळपूर्णा फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. काल रात्री हा भीषण अपघात घडला आहे. शे. शागीर शे. हबीब, शे. तनविर शे. सत्तार आणि अलकेश पप्पू सलामे अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.

काय घडले नेमके?
घटनेच्या दिवशी शे. शागीर शे. हबीब, शे. तनविर शे. सत्तार आणि अलकेश पप्पू सलामे हे तिघेजण आपल्या बाईकने परतवाडा मार्गावरुन आपल्या कुरळ पुर्णा येथील घरुन चांदूरबाजारला येत होते. यादरम्यान वैभव केळकर यांच्या शेतानजीक परतवाडा वाय पॉईंटवर मागून येणार्‍या ट्रकने यांच्या बाईकला जोरदार धडक दिली.

या अपघातात शे. सत्तार आणि अलकेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर शे. तनवीर गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारांसाठी अमरावतीला हलवण्यात आले मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या तिघांच्या मृत्यूनंतर कुरळ पुर्णा या गावावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment