Amravati Bus Accident : प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 3 जणांचा मृत्यू; 20 हून अधिक जखमी

Amravati Bus Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीमध्ये एक भीषण अपघात (Amravati Bus Accident ) घडल्याची माहिती समोर येत आहे. परतवाडा सेमाडोह घटांग येथील घाट वळणाच्या रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांवर सध्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

३ जणांचा मृत्यू – Amravati Bus Accident

याबाबत अधिक माहिती अशी कि, परतवाडा आगाराची MH07 C 9478 हि एसटी बस परतवाडा आगारातून मध्य प्रदेशच्या तुकईथडला जात होती, त्याचवेळी जवाहर कुंड येथे घाट वळणावर असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. आणि बस ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे.इंदू समाधान गंत्रे (६५) आणि ललिता चिमोटे (३०) अशी अपघातात निधन झालेल्या महिलांची नावं आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले आणि प्रवाशांना दरीतून वर काढून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अपघातानंतर चिखलदरा पोलीस आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र भर दिवसा हा अपघात (Amravati Bus Accident) झाल्याने खळबळ उडाली आहे.