SBI ची जबरदस्त योजना! कमी कालावधीत मिळेल भरघोस परतावा; 31 मार्चपर्यंत घेता येणार लाभ

Amrut Kalash FD Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही देशातील अग्रगण्य बँक आहे. त्यामुळे ती आपल्या ग्राहकांसाठी सतत आकर्षक बचत आणि गुंतवणूक योजना सादर करत असते. परंतु सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाची कमी कालावधीत चांगला परतावा मिळवून देणारी “अमृत कलश एफडी योजना” (Amrit Kalash FD Scheme) फायदेशीर आणि लोकप्रिय ठरत आहे. आज आपण याच योजनेविषयी जाणून घेणार आहोत.

काय आहे SBI अमृत कलश एफडी योजना?

ही एक ४०० दिवसांची मुदत ठेव (FD) योजना आहे. जिथे गुंतवणूकदारांना निश्चित आणि आकर्षक व्याजदर दिला जातो. स्टेट बँकेने ही योजना प्रथम २०२३ मध्ये सुरू केली होती. सुरुवातीला या योजनेची मर्यादित मुदत होती, मात्र ग्राहकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे ती अनेकदा वाढवण्यात आली. आता ३१ मार्च २०२५ ही शेवटची मुदत ठरवण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी अवघे २० दिवस शिल्लक आहेत.

या योजनेत गुंतवणूक का करावी?

  1. आकर्षक व्याजदर – सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ७.१०% व्याजदर मिळतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर ७.६०% आहे.
  2. कमी कालावधीत चांगला परतावा – ही योजना केवळ ४०० दिवसांसाठी असून, मोठ्या कालावधीची वाट न पाहता चांगला परतावा मिळतो.
  3. सुरक्षित गुंतवणूक – स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक असल्याने या योजनेतील गुंतवणूक पूर्णतः सुरक्षित आहे.

१ लाख रुपयांवर किती परतावा मिळेल?

  • जर एखाद्या व्यक्तीने १ लाख रुपये गुंतवले, तर त्याला ७,१०० रुपये व्याज मिळेल.
  • ज्येष्ठ नागरिकांना ७,६०० रुपये व्याज मिळू शकते.
  • १० लाखांची गुंतवणूक केल्यास ७१,००० रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो.

परतावा कसा मिळेल?

या योजनेत गुंतवणूकदारांना व्याजाची रक्कम मासिक, तिमाही आणि सहामाही पद्धतीने मिळू शकते. तसेच, मुदतपूर्ती (Maturity) झाल्यानंतर संपूर्ण रक्कम एकत्रही मिळू शकते.

गुंतवणूक कशी करावी?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत:

  1. ऑनलाइन अर्ज: SBI च्या मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे सहज गुंतवणूक करता येईल.
  2. बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष भेट: ग्राहकांनी जवळच्या SBI शाखेत जाऊन अर्ज भरू शकतात.

दरम्यान, SBI ची अमृत कलश एफडी योजना ही कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त परतावा मिळवून देणारी आकर्षक योजना आहे. परंतु ३१ मार्च २०२५ नंतर ही योजना बंद होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा.