चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? मलिकांच्या आरोपांना अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ड्रगचा खेळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर सुरू असून फडणवीस हेच ड्रगच्या उलाढालीचे मास्टरमाईंड आहेत असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मलिकांवर पलटवार केला आहे. चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी केला.

मलिकांच्या आरोपावर अमृता फडणवीस यांनी 2 वाक्यात ट्विट करत मालिकांवर निशाणा साधला आहे. चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ?कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते ! अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. मलिक यांनी आज सकाळीच अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट करत त्यांच्यावर आरोप केले होते.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले-

राज्यातील ड्रगचा खेळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर सुरू असून फडणवीस हेच ड्रगच्या उलाढालीचे मास्टरमाईंड आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी केला. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणाचे फडणवीस यांच्याशी संबंध आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा फायनान्सर जयदीप राणा हा पेडलर आहे. फडणवीस आणि ड्रग याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी नवाब मलिक यांनी म्हंटल.

Leave a Comment