राज्य सरकारकडून मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी वाईन विक्रीचा निर्णय; अमृता फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस याच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून महाविकास आघाडी सरकावर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान त्यांनी आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. वाईन हि दारूच आहे. दुकानात वाईन ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

अँड्रूता फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे तो काही लोकांच्या फायद्यासाठी घेतलेला आहे. वाईन ही दारूच आहे. लहान मुले, महिला या किराणा दुकान तसेच सुपर मार्केट या ठिकाणी जात असतात. वाईन दुकानात ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे.

“राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विध्यार्थी आक्रमक झाले आहेत. याचा परिणाम ते रस्त्यावर उतरले. वास्तविक पाहता महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या नेत्यांना महाराष्ट्रात काय चालले आहे, हेच माहीत नसते. हे राज्य सरकार विद्यार्थी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे,” असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.