हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुका पार पडताच देशातील सर्वसामान्य जनतेला एकमागुन एक झटके बसत आहे. आजपासून एकीकडे टोल टॅक्समध्ये वाढ करण्यात आली आहे तर दुसरीकडे दुधाच्या किंमतीत सुद्धा मोठी दरवाढ पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांचे आवडते असलेले अमूल दूध महागले (Amul Milk Price Hike) आहे. अमूल दूधाच्या किमतीत एक लिटरमागे प्रत्येकी 2 रूपयांनी भाव वाढ करण्यात आली आहे. आजपासूनचे हे नवीन दर लागू होणार असून या निर्णयामुळे जनतेच्या खिशाला आणखी झळ बसत आहे.
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) देशभरामध्ये दुधाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अमूल गोल्ड, अमूल ताज आणि अमूल शक्ती या तिन्ही कंपन्यांच्या दुधाच्या किमतीत वाढ झाली आहे. एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हंटल आहे. अमूलने दूधाच्या किमतीतील ही वाढ (Amul Milk Price Hike) फक्त एका राज्यासाठी नव्हे तर संपूर्ण देशभरात केली आहे. दुधाच्या या वाढलेल्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2023मध्ये अमूलने दुधाच्या किमती वाढवल्या होत्या.
Amul has increased prices of fresh pouch milk (All variants) by Rs 2 per litre, effective from June 3: Gujarat Cooperative Milk Marketing Federation Limited pic.twitter.com/lWsgtv44hx
— ANI (@ANI) June 2, 2024
नव्या दरानुसार कशी असेल दुधाची किंमत ? Amul Milk Price Hike
अमूल गोल्ड 500 एमएल दुधाच्या पाकिटाची किंमत 33 रुपयांवरून 34 रुपये, तर एक लिटर दुधाची किंमत 64 रुपयांवरून 66 रुपये करण्यात आली आहे.
अमूल ताजा 500 एमएल दुधाच्या पाकिटाची किंमत 27 रुपयांवरून 28 रुपये, तर 1 लिटरची दुधाची किंमत 54 रुपयांवरून 56 रुपये करण्यात आली आहे.
अमूल गायीच्या 500 एमएल दुधाच्या पाकिटाची किंमत 28 रुपयांवरून 29 रुपये, तर 1 लिटरची दुधाची किंमत 56 रुपयांवरून 57 रुपये करण्यात आली आहे.
अमूल म्हशीच्या दुधाच्या अर्ध्या लिटर दुधाच्या पाकिटाची पाकिटाची किंमत 35 रुपयांवरून 37 रुपये, तर 1 लिटरच्या पाकिटाची किंमत 70 रुपयांवरून 73 रुपये करण्यात आली आहे.
अमूल स्लिम अँड ट्रिम (एसएनटी) 500 एमएल दुधाच्या पाकिटाची किंमत 24 रुपयांवरून 25 रुपये आणि 1 लिटरची किंमत 48 रुपयांवरून 49 रुपये करण्यात आली आहे.