नागपूर | आठवीमध्ये शिकणाऱ्या ११ वर्षाच्या मुलानं चक्क समोसा न दिल्याच्या रागातून आत्महत्या केली आहे. रविवारी नागपूरातील कोटल रोडवरील गंगानगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. १३ वर्षाच्या मोठ्या भावाने हातातील समोसा हिसाकावून घेतल्यामुळे रागाच्या भरात ११ वर्षीय मुलानं आत्महत्या केली.
मृत्यू पावलेल्या मुलानं कुटुंबाला न सांगता घरातून दहा रुपये घेतले अन् समोसा खरेदीसाठी गेला. त्यावेळी हे दुसऱ्या भावाने बघितले.मोठ्या भावानं लहान भावाच्या हातून घेऊन समोसा खाल्ला होता. त्यामुळे त्या ११ वर्षीय मुलीनं आईकडे तक्रार केली. समोसा हिसकावून घेतल्यामुळे अस्वस्थ होऊन ११ वर्षीय मुलानं रडारड सुरू केली. त्यानंतर आईने त्याला आणखी एक समोसा आणण्यासाठी सांगितलं. मुलानं आणखी एक समोसा आणण्याएवजी दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. बाजूच्या खोलीत शिवणकाम करणाऱ्या आईला आणि खेळणाऱ्या मोठा भावाला याची थोडीशीही कल्पना नव्हती.
थोड्यावेळानंतर आई आपल्या लहान मुलाला पाहण्यासाठी बाहेर आली मात्र, तो कुठेच दिसला नाही. त्यातच दुसरी रुम आतून लावलेली दिसली. शेजाऱ्यांचा ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी घराचे दार तोडले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ११ वर्षीय मुलाने आपलं जीवन संपवलं होतं. ही घटना समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. नागपूर पोलिस या घटनेचा आधिक तपास करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.