हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केरळमधील त्रिशूल गावातील एका 18 वर्षीय मुलाने मारुती 800 कारचे रूपांतर मिनी रोल्स रॉयसमध्ये करून दाखवले आहे. ज्यामुळे आज त्यांचे संपूर्ण राज्यात कौतुक केले जात आहे. या तरुणाने मारुती 800ला मिनी रोल्स रॉयसमध्ये बदलण्यासाठी फक्त 45 हजार रुपये खर्च केले आहेत. ही अद्भुत कलाकृती साकारणाऱ्या तरुणाचे नाव हदीफ असून तो सध्या इयत्ता बारावीत शिकत आहे. हदीफला पहिल्यापासूनच कारचे मॉडेल बदलण्याची आवड होती. ही आवड जोपासत त्याने मिनी रोल्स रॉयस कारची निर्मिती केली आहे.
हदीफने या मिनी रोल्स रॉयस कारविषयी माहिती Tricks Tube नावाच्या यूट्यूब चॅनेवर दिली आहे. या व्हिडिओला आज तीन लाखांवर व्ह्यूज गेले आहेत. या मिनी रोल्स रॉयसला बनवण्यासाठी हदीफला अनेक महिने लागले. या काळात त्याने मारुती 800 चे मूळ रूपच बदलून टाकले. हदीफने या कारला बनवण्यासाठी मेटल शीट वापरत वेल्डिंगचे काम केले आणि त्यानंतर इतर धातूंचा वापर करून ही कार तयार केली. या कारला बनवण्यासाठी हदीफने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळेच या कारला एक वेगळं रूप मिळाले आहे. या कारसाठी त्याने स्वतः एक रोल्स-रॉईस-प्रेरित लोगो ही तयार केला आहे.
https://www.instagram.com/reel/Cx774HYIQRE/?igshid=MzRlODBiNWFlZA==
महत्वाचे म्हणजे, हदीफने मॉडिफिकेशन केलेले हे एकमेव वाहन नाहिये तर याआधीही त्याने त्याच मोटरसायकल इंजिनचा वापर करून जीप प्रोजेक्टवर काम केले होते. हदीफला वेगवेगळया कारचे मॉडिफिकेशन करायला आवडते. त्यामुळे तो असे नवनवीन प्रयोग सतत करत असतो. मात्र यावेळी त्याने एका भन्नाट प्रयोग केल्यामुळे आज तो सर्वत्र चर्चेत आला आहे. सध्या हदीफने बनवलेली ही कार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आता या कारला पाहण्यासाठी हदीफच्या घरी गर्दी जमू लागली आहे. तर, अनेकांजण ही कार खरेदी करण्यासाठी इच्छा व्यक्त करत आहेत.




