सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
वाहने घेऊनही त्यांचे कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचे लिलाव उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत केले जातात. मात्र वाढत्या कोरोनामुळे सातारा येथील उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत २९ जुलै रोजी पाच वाहनांचे ई पद्धतीने जाहीर लिलाव घेण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत देण्यात आली आहे.
मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या 5 वाहनांचा २९ जुलै रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे. ज्या वाहनांचे इ पद्धतीने लिलाव केले जाणार आहेत. त्या वाहनांची पूर्णपणे असलेली माहितीची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्याल याचप्रमाणे वाई व माण तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
लिलाव करण्यात येणारी वाहने खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना वाहनाची प्रत्यक्ष पाहणी सातारा येथील कार्यालयात करता येणार आहे. जाहिर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी दि. 19 ते 23 जुलै या कालावधीत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध असेल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.