Friday, June 9, 2023

तरुणाने बनवले हुबेहुब गरुड पक्ष्यासारखे दिसणारे विमान; पाकिस्तानवर हेरगरी करण्यासाठी होऊ शकतो उपयोग (Video)

वृत्तसंस्था | वडोदरा गुजरात येथील प्रिन्स पंचाल या तरुणाने स्वत: इंटरनेटवर शिकून पक्षाच्या आकाराचे विमान बनवले असून त्याची चाचणी यशस्वी पणे पूर्ण केली. हे विमान गरुड पक्षाच्या सारखे असून ते रिमोट कंट्रोल च्या साह्याने उडवले जाते. रिमोट कंट्रोल पासून एक किलोमीटरच्या अंतरावर यशस्वीरित्या उडू शकते. या विमानाचा पाकिस्तानवर हेरगरी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो असे बोलले जात आहे.

आकाशामध्ये बरेच पक्षी एकटे अथवा थव्यामध्ये उडत असतात. बऱ्याच वेळा विमान अथवा हेलिकॉप्टर ते पक्षी आडवे आल्यामुळे विमानाचा अपघात होण्याची शक्यता असते. तसेच बऱ्याचदा पक्षाचा जीवही जातो. हे टाळण्यासाठी अशा प्रकारचे गरुड पक्षी विमान आकाशात सोडल्यास पक्षी त्या विमानाला घाबरून दूर पळून जातील व वाट मोकळी होईल आणि अपघात टळतील. विमान बनवण्याचा हा हेतू असल्याचे प्रिन्स सांगतो.

प्रिन्सला हे विमान बनवण्यासाठी 17 हजार रुपयांचा खर्च आला. ज्यामध्ये खूप हलक्या वजनाचे मटेरियल आणि खूप चांगल्या क्वालिटीची बॅटरी वापरली गेली जेणेकरून हे विमान खूप दिवस चालू शकेल. रिमोट कंट्रोल पासून पाच किलोमीटर अंतरावर चालवता येऊ शकेल असे बदल करण्याचा उद्देश आहे तसे यश म्हणाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.