धक्कादायक! घर जळून एका वृध्द महिलेचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या घराला आग लागली या आगीत एका वृद्धेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. महामार्ग बांधणीमधील सर्व्हिस रस्त्याला अडथळा ठरत असल्याने या वृद्धेचे घर पेटवून जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

दरम्यान, हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला शेतकरी सूतगिरणी समोर घडला. शरीफा खुर्शीद पठाण (वय ७०) असे मृत वृद्धेचे नाव आहे. दरम्यान त्या वृद्धेच्या घराला आग लागल्याचे समजताच नगरपरिषदेचे फायरमन आसीफ काझीसह कर्मचारी, पोलिस कर्मचारी व ग्रामस्थांनी अग्निशमन बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला मात्र वृद्धेचा आगीत जळून मृत्यू झाला.

या घटनेच्या अनुषंगाने महामार्गावर काम करीत असलेल्या तीन परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेऊन पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहेत याबाबत, समाधान सिताराम मगर (रा. वासूद) यांनी पोलिसात खबर दिली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like