पप्पांचं आजारपण पाहून डॉक्टर व्हायचं ठरवलं; आलियाचं उत्तर ऐकून पंतप्रधान मोदी झाले भावुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावूक रूप आज भारतीयांना पाहायला मिळाले. गुजरातमधील सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या ऑनलाइन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आलिया नावाच्या एका मुलीनं दिलेलं उत्तर ऐकून काही वेळ स्तब्ध झाले. वडिलांचं आजारपण पाहून डॉक्टर व्हायचं ठरवलं आहे असं आलियाने सांगताच मोदी भावुक झाले. ‘डॉक्टर होणेसाठी काहीही अडचण आली तर मला नक्की सांगा, मी लागेल ती मदत करेन’ असं म्हणत मोदी यांनी आलियाला शब्द दिला. यांनतर उपस्थितांमध्ये एकाच टाळ्या वाजल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातमधील सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी त्यांचे अनुभव सांगितले. यावेळी, पंतप्रधानांनी आयुब पटेल नावाच्या लाभार्थीशीही चर्चा केली. अयुब यांनी पंतप्रधानांना त्यांच्या काचबिंदूची समस्या आणि त्यांच्या मुलींच्या स्वप्नांबद्दल सांगितले. आपण सौदी अरेबियाला गेलो असताना डोळ्यांमध्ये एक ड्रॉप टाकल्यानं ९५ टक्के दृष्टी गेल्याचं पटेल यांनी सांगितलं. तुम्हाला किती मुलं आहेत? ती काय करतात असा प्रश्न मोदी यांनी विचारला. यावेळी मला दोन मुली आहेत. त्यातील एकीला डॉक्टर व्हायचं आहे असं आयुब यांनी सांगितलं.

आयुब यांच्या मुलीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न ऐकून पंतप्रधान मोदी यांनी तिच्यासोबत बोलण्याची इच्छा व्यक्त केली. आयुब यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या आलियाने माईक हातात घेताच तुला डॉक्टर व्हावं असं का वाटलं असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी केला. यावेळी वडिलांचं आजारपण पाहून मी डॉक्टर होण्याचं ठरवलं आहे असं आलीय म्हणाली. त्यानंतर आलियाला आश्रू अनावर झाले. हे पाहून पंतप्रधान मोदीही काहीवेळ भावुक झाले.

आलियाच्या उत्तर पाहून पंतप्रधान मोदी यांनी प्रथम तिचं कौतुक केलं. “मुली, तुझी संवेदना, हीच तुझी ताकद आहे असं म्हणत डॉक्टर होण्यासाठी काहीही मदत लागली तर मला सांगा असं आश्वासनही मोदी यांनी दिले. यावेळी मोदींनी अयुबला मुलींची स्वप्नं पूर्ण करायला सांगितलं. त्यात काही अडचण असेल तर मलाही सांगा. मुलींच्या मनात हा विचार हीच मोठी गोष्ट आहे असं म्हणत मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं.

Leave a Comment