Tuesday, February 7, 2023

जाधववाडीत राहत्याघरी वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -

औरंगाबाद | जाधववाडी येथे राहणाऱ्या वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

श्रीकांत शंकरराव जोशी (76) असे आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. श्रीकांत जोशी हे कुटुंबियांसह जाधववाडी परिसरातील गल्ली क्रमांक सातमधील तीन मजली घरात राहत होते. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास जोशी यांनी तिस-या मजल्यावरील खोलीतील छताच्या पंख्याला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतला.

- Advertisement -

नेहमी सकाळी सहाच्या सुमारास झोपेतून उठणारे जोशी हे बराचवेळ झाला. तरी खोलीबाहेर न आल्याचे त्यांना पाहण्यासाठी कुटुंबिय गेले. तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना फासावरून उतरवत बेशुध्दावस्थेत तात्काळ उपचारासाठी घाटीत आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद हर्सुल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे