सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाबळेश्वर तालुकाध्यक्षपदी आनंद ढेबे यांची तर युवकच्या अध्यक्षपदी संकेत ढेबे यांची नुकतीच निवड करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक नुकतीच महाबळेश्वर येथे पार पडली. यावेळी या निवडी करण्यात आल्या.
आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्यात रासपचे संघटन वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असून, त्यासाठी नवीन तरुणांना संधी देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्ता केल्या आहेत. त्यामुळे पक्षाला उभारी मिळून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न होणार आहे.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते, कोकण विभागीय अध्यक्ष भगवान ढेबे, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजीत दादा सूळ, महाबळेश्वर मधील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.