व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पत्रकार संभाजी चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : दोघे ताब्यात

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
नागठाणे विभागातील जेष्ठ पत्रकार संभाजी चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी नागठाणे येथील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर एकजण अद्याप फरार आहे. संभाजी चव्हाण यांनी 5 डिसेंबर रोजी विषप्राशन केले होते जवळपास 7 दिवसांच्या उपचारानंतर 12 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली होती.

या घटनेनंतर संभाजी चव्हाण यांच्या कुटूंबियांसह पत्रकाराच्यावतीनेही कोल्हापुर परिक्षेत्राचे तत्कालीन आय. जी मनोज लोहिया, सातारा जिल्हा पोलीस पोलीस प्रमुख समीर शेख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. आत्महत्या प्रकरणाचा जवळपास एक महिन्यानंतर गूढ उकलण्यात  एल. सी. बी व बोरगांव पोलीसांना यश आले. सखोल चौकशीवरून संभाजी चव्हाण यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे समोर आले.

आत्महत्येस कारणीभूत संजय दिनकर जगताप, राजेंद्र दिनकर जगताप अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. तर राहूल राजेंद्र जगताप हा अद्याप फरारी आहे. या प्रकरणात वैभव संभाजी चव्हाण यांनी फिर्याद दिली असुन या प्रकरणाचा पुढील तपास  स. पो. नि. रविंद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो. उप निरिक्षक वर्षा डाळींबकर करत आहेत.