अग्नीवीरांसाठी आनंद महिंद्रा यांची मोठी घोषणा; म्हणाले की त्यांना…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लष्कर भरतीशी संबंधित अग्निपथ योजनेबाबत देशभरात सुरू असलेल्या हिंसाचारा दरम्यानच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी याबाबत शोक व्यक्त करत अग्निवीरांसाठी मोठी घोषणा केली आहे . ४ वर्षाच्या देशसेवेनंतर अग्नीवीर तरुणांना महिंद्रा मध्ये नोकरी देण्यात येईल असं ट्विट त्यांनी केलं आहे.

आनंद महिंद्रा म्हणाले, अग्निपथ योजनेमुळे जी हिंसा होत आहे त्यांने मी दु:खी आहे. गेल्यावर्षी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. यामुळे मी आनंदी होतो. यामुळे अग्निविरांना मिळणारी कौशल्य आणि शिस्त त्यांना रोजगारक्षम बनवतील. या रोजगारक्षम तरूणांना महिंद्रा ग्रुपमध्ये नोकरीची संधी दिली जाईल,

काय आहे अग्निपथ योजना

लष्कर, हवाई दल आणि नौदलात भरतीच्या नवीन अग्निपथ योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी ठेवण्यात येणार आहे. . चार वर्षांनंतर 25 टक्के अग्निवीरांना सैन्यात भरती केले जाईल. वय वर्षे 17 ते 21 दरम्यानच्या तरुणांना या अग्निपथ योजनेचा लाभ घेऊन सैन्यात चार वर्षांसाठी भरती होता येईल. चार वर्षांनंतर या अग्निवीरांना निवृत्त केले जाईल. मात्र, यातील 25 टक्के तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाईल. या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी महिन्याकाठी 30 हजार रुपये, तर चौथ्या वर्षी यात वाढ होऊन 40 हजार रुपये वेतन मिळेल.

Leave a Comment