Sunday, June 4, 2023

‘मिनी जिप्सी’ बनवणाऱ्या सांगलीकराची आनंद महिंद्रांकडून दखल; दिली ‘ही’ मोठी ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी आपल्या कल्पकतेच्या आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर भंगाराचे साहित्य आणि स्वतःच्या दुचाकी साहित्याच्या पार्टचे जुगाड करत छोटीशी पण युनिक अशा चार चाकी गाडीची बांधणी केली आहे. या गाडीचे संपूर्ण सांगलीत चर्चा असून आता खुद्द आनंद महिंद्रा यांनीही या गाडीची दखल घेतली आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हंटल की, हे वाहन नियमांचे उल्लंघन करत असल्याने स्थानिक अधिकारी लवकर किंवा नंतर वाहनचालकाला ते चालवण्यास थांबवतील. मी त्याला वैयक्तिकरित्या त्याच्या वाहनाच्या बदल्यात बोलेरो ऑफर करेन. आम्हाला प्रेरणा देण्यासाठी त्याची निर्मिती महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शित केली जाऊ शकते. कारण संसाधनसंपन्न म्हणजे कमी संसाधनांत अधिक करणे होय असे म्हटले आहे.

भंगाराचे साहित्य आणि  स्वतःच्या दुचाकीतील पार्टचा वापर करुन देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांनी छोटीशी पण युनिक अशा चार चाकी गाडी बनवली आहे. एका हाताने अपंग आणि अशिक्षित असलेल्या लोहार यांनी ही मिनी जिप्सी मुलासाठी, कुटुंबासाठी बनवली. या गाडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि महाराष्ट्र या मिनी जिप्सीची चर्चा सुरु झाली. ही गाडी स्टार्टरने नव्हे तर पायाने किक मारून चालू होते. पेट्रोलवर ही गाडी धावत असून 1 लिटर पेट्रोलमध्ये 40 ते 45 किलोमीटर इतके मायलेज असून ताशी 40 किलोमीटर वेगाने ही गाडी धावते. तर ही गाडी बनवण्यासाठी लोहार यांना 50 ते 60 हजार इतका खर्च आला आहे