Anandacha Shidha : गणेश चतुर्थीनिमित्त सरकारचा मोठा निर्णय; फक्त 100 रुपयांत मिळणार ‘या’ 4 वस्तू

Anandacha Shidha Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असून प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणरायाच्या आगमनाने सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. आता याच आनंदात सरकारच्या एका निर्णयाने आणखी भर पडली आहे. गणेश चतुर्थीचे निमित्त साधून शिंदे सरकार कडून पुन्हा एकदा ‘आनंदाचा शिधा’ ( Anandacha Shidha) या उपक्रमाचे वाटप करण्यात येणार आहे. हा आनंदाचा शिधा यंदाही अवघ्या १०० रुपयांत उपलब्ध असून सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून ४ वस्तू देण्यात येणार आहेत.

कोणकोणत्या वस्तू मिळणार? Anandacha Shidha

महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पात्र कुटुंबांना फक्त 100 रुपयांत चणाडाळ, तेल, साखर, रवा अशा ४ वस्तू मिळणार आहे. यात चणाडाळ 1 किलो, सोयाबीन तेल 1 लिटर, साखर 1 किलो, आणि रवा 1 किलो मिळेल. राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब जनतेचा सण गोड़ व्हावा यासाठी सरकार हा उपक्रम राबवत आहे. मात्र यासाठी काही अटी सुद्धा आहेत. त्याची पूर्तता झाल्यानंतरच आनंदाचा शिधा मिळणार आहे.

आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) वाटपासाठी सरकारकडून तब्बल 562 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहेत. जे कुटुंब अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधरक आहे त्यांना सरकारच्या या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. सोबतच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनाही हा आनंदाचा शिधा दिला जाईल. एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणूक झाली त्यामुळे तेव्हा आचारसंहितेमुळे दोन महिने आनंदाचा शिधा बंद होता, आता मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेला या आनंदाच्या शिध्याचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी दिवाळी, दसरा, गुढीपाडव्या सारख्या सणासुदीला आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता, आता गणपतीच्या सणाला सुद्धा आनंदाचा शिधा मिळणार असल्याने सर्वसामान्य जनतेसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.