आनंदीबेन पटेल नव्या राज्यपाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |  नव्याने केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारमध्ये राज्यपालांच्या बदल्या केल्या जाणार हे निश्चित होते. त्याला आज मुहूर्त लागला आहे. उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल पदी आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राम नाईक यांचे वय ८५ झाल्याने त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय भाaजपने घेतला आहे. तर आनंदीबेन पटेल राज्यपाल असणाऱ्या मध्य प्रदेशाच्या राज्यपाल पदाची जबाबदारी लालजी टंडन यांना देण्यात आली आहे.

पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धनखड यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्रिपुराचं राज्यपालपद रमेश बैस यांना देण्यात आलंय. फागू चौहान हे बिहारचे नवे राज्यपाल असतील. नागालँडच्या राज्यपालपदी एन.रवी यांची नियुक्ती करण्यात आलीय.

मोदी सरकारची नव्याने स्थापना झाल्यावरच या राज्यपाल पदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्रातील मुरंबी नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची देखील एकांद्या राज्यपाल पदी निवड केली जाणार अशी शक्यता होती. मात्र त्यांना पुन्हा एकदा थांबा आणि वाट बघा अशी आज्ञा पक्षाने दिली आहे असेच चित्र सध्या बघायला मिळते आहे.

Leave a Comment