मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या मातोश्री भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळात थरकाप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

लोकसभेच्या आचारसंहिता चे बिगूल वाजताच राज्यभर राजकीय वातावरण तापायला लागले आहे. अमरावती मध्ये राष्ट्रवादीच्या नवनीत कौर राणा विरुद्ध शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्यात जोरदार लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. अशात आनंदराव अडसूळ यांनी मुंबई येथे मेळघाटचे माजी आमदार राजकूमार पटेल यांच्यासह शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या  राजकीय वर्तूळात थरकाप उडाला आहे.
goldmine-fb-Marathi.jpg

शिवसेनेचे खासदार हे जिल्हात कमी उपस्थित राहतात आणि त्यामुळे भागाचा विकास झाला नसल्याची चर्चा चौकाचौकात, टपर्‍यांवर सूरू आहे. नवनीत कौर राणा यांच्याकडे  नवीन पर्याय असू शकतो ह्या दृष्टिकोनातून जनता पाहत असल्याचे चित्र आहे.  या पार्श्वभूमीवर  मेळघाट चे माजी आमदार राजकूमार पटेल यांनी शिवसेनेचे अध्यक्ष ऊद्धव ठाकरेंची अळसूळ व कार्यकर्त्यांसह मूंबई येथिल मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या भेटीमूळे आता मेळघाटातील मोठा गठ्ठा मते हि अडसूळांच्या पदरात जातील की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमरावतीत लोकसभेसाठी शिवसेनेकडून आनंदराव आळसूळ विरूद्ध मागील वेळी राष्ट्रवादी कडून निवडणुक लढविणार्‍या नवनीत कौर राणा यांच्यात साम दाम दंड भेद सह रणसंग्राम होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात आहे. जिल्ह्यातील  राजकारणामध्ये पून्हा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमधे जोश आलेला दिसत आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

Leave a Comment