हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेअर बाजारात कधी कोणाचे नशीब कसे बदलेल हे आपण सांगू शकत नाही. इथे रावाचा रंक आणि रंकाचा राव होण्यास जराही अवधी लागत नाही . पण तरीही इथे आपण जेवढी जोखीम पत्करून योग्य मार्गदर्शनाने जेव्हढी गुंतवणूक करू तितकाच जास्त फायदा आपल्याला होताना दिसेल. इथे एका बाजूला आपल्याला पराभवाची खोल दरी निराशेच्या गर्तेत झोकण्याचा प्रयत्न करेल तिथेच दुसऱ्या दिशेला सफलतेचे आकाश आपल्याला खुणावत असेल. शेअर बाजारातील वातारवण हे अकल्पित असेच असते इथे कधी काय ? घडेल हे सांगणे तसे कठीणच आहे आता पहा ना तीन महिन्यातच एका सिमेंट कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाखांचे रूपांतर 15 लाख रुपयांत करून देत 3 महिन्यात 1415% रुपयांचा जबरदस्त रिटर्न मिळवून दिला आहे आणि एका वर्षात या स्टॉकने 1030% हुन अधिक रिटर्न मिळवून दिला आहे. आंध्रा सिमेंट लिमिटेड अस या शेअर्सचे नाव आहे.
आंध्रा सिमेंट लिमिटेड या स्टॉक ने चक्क तीन महिन्यातच शेअर बाजारात धुमाकूळ घातला आहे. 2 मार्च 2023 रोजी 4.95 असलेला हा शेअर अप्पर सर्किट लागताच आज आपल्या ऑल टाइम हाय रेट वर म्हणजेच 70.08 रुपयांवर पोहचला आहे. आंध्रा सिमेंटने गेल्या कित्येक दिवसांपासून अप्पर सर्किटचा आपला प्रवास अविरत सुरू ठेवला आहे . गेल्या वर्षभरात या स्टॉक ने 700% रिटर्न दिले आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांचे 1 लाख चक्क 8 लाखात रूपांतरित झाले आहे. ह्या शेअरचा गेल्या तीन वर्षाचा प्रवास पाहता या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1986% इतका परतावा देऊन मालामाल केले आहे बीएसई वर या स्टॉकने आपला ऑल टाईम हाय रेट 70.8 रुपये तर ऑल टाइम लो रेट हा 4.95 रुपये इतका नोंदवला आहे.
आंध्रा सिमेंट शेअरचा आजवरचा इतिहास पाहता हा शेअर 2020 च्या सुरुवातीला 2.04 रुपयांना मिळत होता त्याच वर्षाच्या अखेरीस तो 6.03 रुपयांवर पोहोचला 2021 सालच्या सुरुवातीला तो 6.33 रुपयांवर पोहोचला आणि अखेरीस त्याने 16.45 रुपये इतका दर नोंदवला पुढे ह्या शेअरची घसरण होऊन तो 5.91 रुपयांवर आला 2023 मध्ये 2 मार्च 2023 नंतर या स्टॉकने यशस्वी गगन भरारी घेत 6.33 रुपयांवरून आपल्या ऑल टाइम हाय रेट 70.08 रुपयांवर पोहचला.