मुंबई | सोशल मिडियावर सध्या एका बाप-लेकीचा फोटो तुफान व्हायरल होतोय. या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे डीएसपी झालेल्या लेकीला इन्स्पेक्टर बाबा सॅल्यूट करताना दिसतायत. बाप-लेकीच्या या फोटोने सोशल मिडियावर सर्वांचंच मन जिंकलंय. डीएसपी लेकीला इन्रस्पेक्टर बाबांनी सॅल्यूट केलं तो क्षण या फोटोत कॅप्चर झालाय.
आंध्रप्रदेश पोलिसांनी (Andhra Pradesh Police) 3 जानेवारीला पोलीस मेळाव्याचं आयोजन केलं होते. याच कार्यक्रमात पोलीस सब इन्स्पेक्टर श्याम सुंदर यांनी डीएसपी पदावर असलेल्या आपल्या मुलीला म्हणजेच जेसी प्रशांती यांना सॅल्यूट केला. आंध्र प्रदेश राज्य पोलिस ड्यूटी मीट इग्नाइट
मध्ये सहभागी होण्यासीठी हे बाप-लेक तिरुपति पोहोचले.आपल्या लेकीला सॅल्यूट करताना त्यांची छाती अभिमानाने फुलली होती. हा क्षण पाहून उपस्थित अधिकारी देखील भावूक झाले. `या कार्यक्रमात कुटूंब देखील सहभागी झाले होते. सर्किल इंस्पेक्टर श्याम सुंदर आपली मुलगी जेसी प्रशांति (Jessi Prasanti) ला अतिशय गर्व आणि सम्मानाने सॅल्यूट केलं.
जेसी प्रशांति (Jessi Prasanti) 2018 बॅच ची अधिकारी आहे. सध्या ती गुंटूर जिल्ह्यात डीएसपी पद सांभाळत आहे. तर जेसीचे वडिल सुंदर यांनी १९९६ मध्ये पोलीस विभागात सब इन्स्पेक्टरच्या रुपात जॉईन झाले. सध्या ते सर्किल इंस्पेक्टर असून पोलीस ट्रेनिंग सेंटर (पीटीसी) मध्ये तैनात आहेत.सर्किल इंस्पेक्टर श्याम सुंदर आपल्या मुलीला ड्युटीवर पाहून अतिशय भावूक झाले. यानंतर ते आपल्या मुलीजवळ गेले आणि अभिमानाने ‘नमस्ते मॅडम’ म्हणत सॅल्यूट केलं. याला उत्तर देताना प्रशांतिने देखील ‘थँक्यू डॅड’ असं म्हटलं. मीडियाशी बोलताना श्याम सुंदर म्हणाले की,’मला विश्वास आहे की माझी मुलगी खूप इमानदारीने आपलं कर्तव्य पार पाडत आहे. गरजूंची सेवा करत आहे.’ तसेच तिरुपति अर्बन डिस्ट्रिक्ट एसपीए रमेश रेड्डी यांनी म्हटलं की,’आपण असं चित्र सामान्यपणे सिनेमात पाहतो. या क्षणानंतर मला ‘गंगाजल’ सिनेमाची आठवण आली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’