Anganwadi Bharti 2024 | अंगणवाडी मुख्यसेविकांसाठी होणार मोठी भरती; भरली जाणार इतकी पदे

Anganwadi Bharti 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Anganwadi Bharti 2024 | आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. आज देखील अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता राज्यातील महिलांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी आहे. महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. ती म्हणजे आता महिला आणि बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका पदासाठी एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत गट क संवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. 14 ऑक्टोबर पासून ही भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. तसेच 3 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Anganwadi Bharti 2024

महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेवकांची पदे भरली जाणार आहेत.

एकूण रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका या पदाच्या 102 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

मासिक वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या अंगणवाडी सेविकांना 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपये एवढे वेतन मिळेल.

किती अंगणवाड्यात पदे भरली जाणार

या भरती अंतर्गत राज्यातील 25 अंगणवाड्यासाठी मुख्य पर्यवेक्षिका पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 28 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज शुल्क | Anganwadi Bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये फी आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये एवढी फी आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

14 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

3 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.