Anganwadi Helper Recruitment | अंगणवाडी मदतनीसांची मोठी भरती सुरु; भरली जाणार 14,690 पदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Anganwadi Helper Recruitment | ज्या महिलांना अंगणवाडीची मदतनीस म्हणून काम करायचे आहे. त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पातील एकूण 14 हजार 690 अंगणवाडी मदतनीसंचा (Anganwadi Helper Recruitment) रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी आता अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. ही एक मोठी संधी आहे. आणि पदे देखील खूप भरली जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात उशीर न करता लवकरात लवकर अर्ज सादर करा

या जागा महिला आणि बाल विकास विभागाच्या निर्देशनानुसार भरल्या जाणार असल्याची माहिती देखील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिलेली आहे. या रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Helper Recruitment) जागा 31 ऑगस्टपर्यंत भरल्या जाणार आहेत.

मदतनीस पदाचा अर्ज करण्यासाठी महिला या बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्यांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे या दरम्यान असणे गरजेचे आहे. विधवा महिलांच्या बाबत कमाल मर्यादा ही 40 वर्षे एवढे ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत महिला उमेदवारांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर करायचे आहेत. अशी माहिती देण्यात आलेली आहे.