अनिकेत कोथळे खून प्रकरणी ७६ दस्त ऐवजांची यादी न्यायालयास सादर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दस्त ऐवजांची कायद्याप्रमाणे बचाव पक्षाला नोटीस.

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे 

संपूर्ण राज्यभर गाजलेल्या अनिकेत कोथळे खूनप्रकरणाची सुनावणी आज पासून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्यासमोर सुरु झाली. आज सरकारी पक्षातर्फे एकूण ७६ दस्त ऐवजांची यादी न्यायालयात दाखल केली. आणि त्या दस्त ऐवजांची कायद्याप्रमाणे नोटीस बचाव पक्षाला द्यावी लागते ती देखील देण्यात आली आहे. आज आरोपींनी यावर कोणतेही उत्तर दिले नाही, परंतु आरोपींनी यावर उत्तर देण्याकरिता वेळ मागून घेतला आहे. २२ मार्चला आरोपींचे या दस्त एवजांच्या यादीवर उत्तर येणे अपेक्षित आहे. या याप्रकरणाची पुढील सुनावणी आता २२ मार्च रोजी होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.

पोलिस उपनिरीक्षक युवराज कामठेेसह साथीदारांनी अनिकेत कोथळे याचा कट रचून खून केल्याचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मागील सुनावणीवेळी न्यायालयासमोर केला होता. कामठेसह साथीदारांवर दहा आरोप ठेवावेत, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली होती. अनिकेत कोथळे खून प्रकरणात आज सरकारी पक्षातर्फे एकूण ७६ दस्त ऐवजांची यादी न्यायालयात दाखल करण्यात आली. आणि त्या दस्त ऐवजांची कायद्याप्रमाणे नोटीस बचाव पक्षाला द्यावी लागते ती देखील देण्यात आली आहे. बचाव पक्षाला सूचित करण्यात आले आहे कि यातील कोणती कागदपत्रे तुम्हाला मान्य आहेत किंवा अमान्य आहेत जे जेनेकरून पुढच्यावेळेला आम्हाला साक्षीदारांना न्यायालयात पाचारण करण्यात येईल आणि खटल्याच्या सुनावणीला तातडीने सुरु करण्यात येईल.

आज आरोपींनी यावर कोणतेही उत्तर दिले नाही, परंतु आरोपींनी यावर उत्तर देण्याकरिता वेळ मागून घेतला आहे. २२ मार्चला आरोपींचे या दस्त एवजांच्या यादीवर उत्तर येणे अपेक्षित आहे. त्यानंतर कोणत्या साक्षीदाराला केंव्हा बोलवायचे याबाबतचा अहवाल आम्ही न्यायालयात सादर करू अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्यासमोर सुरू आहे.

Leave a Comment