हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचे संपूर्ण देशभरात विविध प्रकल्प आहेत. परंतु आता अनिल अंबानी हे आपल्या कोकणात गुंतवणूक करणार आहेत. कोकणात ते तब्बल 1000 कोटींची गुंतवणूक करण्याची माहिती समोर आलेली आहे. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड ही कंपनी रत्नागिरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्फोटके दारूगोळा लहानशस्त्रे तयार करणारा एक प्लांट उभा करणार आहे. हा प्लांट संरक्षण क्षेत्रातील एक सर्वात मोठा प्रकल्प मानला जात आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे.
अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने या मोठ्या डिफेन्स प्रोजेक्टची घोषणा केलेली आहे. ही कंपनी कोकणामध्ये धीरूभाई अंबानी सिटी उभारणार आहे. यासाठी रत्नागिरीतील वातड औद्योगिक परिसरात जवळपास 1000 एकर जमीन घेण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी धीरूभाई अंबानी सिटी उभारलेली जाणार आहे. यामध्ये विविध प्रकारची शस्त्रे, स्फोटके, दारूगोळा तयार केला जाणार आहे.
या कंपनीमार्फत दारूगोळा श्रेणीत लहान मध्यमाने मोठ्या कॅलिबर आणि टर्मिनल गाईडेड यांची निर्मिती केली जाणार आहे. या डिफेन्स प्रोजेक्टमध्ये पुढील दहा वर्षात ही कंपनी जवळपास दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आहे. यासाठी जगातील आघाडीच्या सहा संरक्षण कंपन्यांसोबत करार देखील केला जाणार आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स लिमिटेड या कंपनीला सरकारकडून शास्त्र निर्मितीचा परवाना देखील मिळाला आहे. या कंपनीचा नागपूरच्या मिहानमध्ये फ्रान्सच्या दोन आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसोबत यशस्वी संयुक्त उपक्रम देखील सुरू आहे.. या कंपन्यातील उत्पादनातील 100% निर्यात केली जाणार आहे. आणि कंपनीद्वारे कंपनीने 1000 कोटींची संरक्षण उपकरणे निर्यात केलेली आहेत