देवेंद्र फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप!! थेट फोटो दाखवत अनिल देशमुखांचा धक्कादायक खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध असलेला समित कदम नावाचा व्यक्ती मी गृहमंत्री असताना माझ्या घरी आला आणि त्याने माझ्यकडे इन्व्हलप दिले. त्यामध्ये काही प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास सांगितलं. मी जर सही केली असती तर उद्धव ठाकरे अडचणीत आले असते आणि आदित्य ठाकरे जेलमध्ये असते मात्र मी सही केली नाही असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला. देशमुखांच्या या आरोपांनी फडणवीसांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक महत्वाचे खुलासे केले. यावेळी त्यांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे काही फोटो सुद्धा मीडियासमोर आणले. समित कदम हा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा माणूस आहे. त्यामुळेच समित कदम साधा नगरसेवक नसतानाही त्याला Y दर्जाची सुरक्षा देण्यात देण्यात आली आहे. असं अनिल देशमुख म्हणाले. मी राज्याचा गृहमंत्री असताना समित कदम हा ५ ते ६ वेळा मला भेटायला आला होता, लिफाफा घेऊन तो माझ्याकडे आला होता. त्यातील प्रतिज्ञापदावर मला स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला जात होता. मी जर तेव्हा सही केली असती तर विनाकारण उद्धव ठाकरे हे प्रचंड अडचणीत आले असते आणि आदित्य ठाकरे तर जेलमध्ये गेले असते. ठाकरे सरकार सुद्धा तेव्हाच कोसळलं असते. मात्र मी दबावाला बळी न पडता सही केली नाही. राजकीय नेत्यांच्या मुलाला खोट्या आरोपात अडकवता येईल याप्रकारचा प्रयत्न ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला असं त्यांनी सांगितले.

एकतर जेलमध्ये जा, नाहीतर भाजपात या असं यांचे धोरण होते. माझ्यावर पहिला प्रयोग करण्यात आला तो यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला तो यशस्वी झाला. तिसरा प्रयोग अजित पवारांवर आणि तो यशस्वी झाला असं अनिल देशमुख यांनी म्हंटल. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कितीही धमक्या दिल्या तरी आपण घाबरत नाही. बात निकलेगी तो दूर तक जायेगी, सर्वकाही हळूहळू बाहेर येईल. मी योग्य वेळी सर्व बाहेर काढेन, मी घाबरत नाही असा इशारा अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस याना दिला.