अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून 6 नोव्हेंबर पर्यंत त्याना विशेष कोर्टाकडून ईडी कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आपल्याला घरचे अन्न मिळावे, तसेच चौकशी दरम्यान वकील हजर असावे अशी विनंती अनिल देशमुख यांनी कोर्टाला केली होती, त्याला कोर्टाने परवानगी दिली आहे

उच्च न्यायालयात हे प्रकरण आलं तेव्हा ईडीतर्फे आरोपी नसल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच अनिल देशमुख यांना उच्च रक्त दाबाचा त्रास आहे, तसंच ह्दयविकाराचा त्रास आहे, त्यामुळे त्यांना कस्टडी देऊ नये असा युक्तीवाद अनिल देशमुख यांच्या वकिलांनी केला होता. पण न्यायालयाने अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली. 6 नोव्हेंबरनंतर अनिल देशमुख यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते.13 तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली होती..

Leave a Comment