शरद पवारांना राजी करण्यासाठी देशमुखांनी 2 कोटी मागितले; सचिन वाझेचा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला पुन्हा सेवेत एकदा रुजू करून घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजी करण्याकरिता दोन कोटी रुपयांची मागणी केल्याची खळबळजनक माहिती सचिन वाझे याने ईडीला दिली आहे.

वाझे याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यास शरद पवार यांचा विरोध होता. त्यांना राजी करण्यासाठी देशमुख यांनी माझ्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. त्यावर वाझे याने एवढी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर देशमुख यांनी वाझेला रक्कम देण्यासाठी मुदत दिली, असे वाझे याच्या जबाबात म्हटले.

प्रत्येक बारमालकाकडून ३ लाख रुपये गोळा करण्याचे अनिल देशमुख यांनी आदेश देत १७५० बार आणि रेस्टॉरंटची यादी देण्यात आल्याचेही वाझेने सांगितले. डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान वाझेने ४.७ कोटी रुपये गोळा केले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात अनिल देशमुख यांनी मला त्यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून माझ्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर फोन केला आणि मला आजपर्यंत गोळा केलेली रक्कम कुंदन शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या सूचना दिल्या.

Leave a Comment