अनिल देशमुख लवकरच मंत्रिमंडळात दिसतील; राष्ट्रवादी आमदाराचे मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटी वसुली प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे लवकरच मंत्रिमंडळात दिसतील अस मोठं विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. अमोल मिटकरी हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले.

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक होती अस शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सांगितले होते. मी तर पक्षाचा लहान कार्यकर्ता आहे पण मी विश्वासाने सांगतो की अनिल देशमुख साहेब परत येतील आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील कदाचित गृहस्थानावरही दिसू शकतील अस महत्त्वपूर्ण विधान अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

अनिल देशमुखांच्या संदर्भात भाजपने कटकारस्थान केलं आहे आणि हे आता समोर आलं आहे. सचिन वाझे रोज रंग बदलतोय. परमबीर सिंह भ्रष्टाचारी माणूस आहे. त्यांच्या आरोपाने काहीही सिद्ध होणार नाही, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी म्हणत लवकरच अनिल देशमुख महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परत येतील असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.

Leave a Comment