एजाज पटेलच्या 10 विकेटनंतर कुंबळेचं ट्विट चर्चेत; म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध च्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वच्या सर्व 10 बळी घेत नवा विश्वविक्रम केला आहे. एजाज ने हा विक्रम करताच भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी पाकिस्तान विरुद्ध 10 बळी घेतले होते.त्यानंतर खुद्द अनिल कुंबळे यांनी एजाज पटेलच कौतुक केले आहे.

एजाज तुझं क्लबमध्ये स्वागत आहे. पर्फेक्ट १०. कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अशी कामगिरी साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. असे म्हणत अनिल कुंबळे यांनी एजाज पटेल याचे अभिनंदन केलं

एजाज पटेलने दुसऱ्या कसोटीत 47.5 षटके टाकली आणि 12 षटके निर्धाव टाकत 119 धावांत 10 विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. १४१ वर्षांच्या कसोटी इतिहासात एका डावात १० बळी घेणारा एजाज पटेल हा जगातील फक्त तिसरा गोलंदाज आहे. कुंबळे आणि एजाजव्यतिरिक्त इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम पहिल्यांदा रचला होता

You might also like