हिंमत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा; अनिल परब यांचे सोमय्यांना आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्टवर हातोडा पाडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे दापोली ला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजप कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आहे. दरम्यान, ते रिसॉर्ट माझं नाहीच, हिम्मत असेल तर ते पाडून दाखवा असे खुल आव्हान अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना दिले आहे.

हा रिसॉट माझा नाही. पण जाणूनबुजून या प्रकरणात माझं नाव जोडून माझी प्रतिमा मलिन करण्याचे काम सोमय्या करत आहेत. असे अनिल परब म्हणाले. या रिसॉर्ट बाबत ज्या चौकश्या करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. सगळी कागदपत्रे तपासून झालेली आहेत. वेगवेगळ्या एजन्सी ने ती कागदपत्रे तपासली आहेत. या रिसॉर्ट बाबत माझा काहीही संबंध नाही हे मी वारंवार सांगितले आहेत. तसेच मी कोर्टात देखील गेलो आहे असे अनिल परब यांनी सांगितले.

हा रिसॉर्ट माझाच आहे हे किरीट सोमय्या यांनी कागदोपत्री सिद्ध करावं . रिसॉर्ट वर हातोडे मारायला ते काय पालिकेचे नोकर आहेत का असा सवाल करत हिंमत असेल तर हिम्मत असेल तर त्यांनी ते रिसॉर्ट पाडून दाखवावे असे खुल आव्हान अनिल परब यांनी सोमय्याना दिले.

Leave a Comment