ED च्या धाडीनंतर अनिल परब यांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या संपत्तीवर काल ईडीच्यावतीने धाडसत्र राबवण्यात आले. तसेच दिवसभरात तब्बल १३ तास त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर परब यांनी ईडीच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली. साई रिसॉर्ट चालू नसतानाही त्याबाबत तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वास्तविक साई रिसॉर्टचे मालक मी नसून सदानंद कदम हे आहेत, असे परब आहे.

ईडीच्या चौकशीनंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “जे रिसॉर्ट सुरूच नाही. याच्याबद्दल प्रदुषण महामंडळाने अहवाल दिला आहे. प्रांतअधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी हे रिसॉर्ट चालूच नसल्याचा रिपोर्ट दिला आहे. यानंतरही माझ्या नावाने, साई रिसॉर्टच्या नावाने अशाप्रकारची नोटीस काढण्यात आली. एक तक्रार दाखल करण्यात आली आणि त्याच तक्रारीवरून ईडीने माझ्यावर छापेमारीची कारवाई केली आहे.

वास्तविक पाहता खरी माहिती ही आहे की, पर्यावरणाची दोन कलमे लावून या रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जाते असे सांगत अशाप्रकारचा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलीस स्टेशनला नोंद केला. साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत. त्यांनी त्यांचा मालकी हक्का सांगितला आहे. कोर्टात देखील त्यांनी तसा दावा केला आहे. त्यांनी त्यांच्या खर्चाचे सर्व हिशोब दिले आहेत, असेही परब यांनी म्हंटले.

अनिल परब यांच्याशी संबंधित ईडीची ६ ठिकाणी छापेमारी

दरम्यान, ईडीने आतापर्यंत अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या अजिंक्यतारा या ठिकाणी छापेमारी केली. याशिवाय वांद्रे पूर्वमधील मोनार्क इमारतीतील खासगी निवासस्थानी देखील ईडीने छापेमारी केली. चेंबुरच्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरीही ईडीने छापेमारी केली. दापोलीतील साई रिसॉर्ट येथे ईडीने चौथा छापा टाकला. दापोलीतील जमीन विक्रेते विभास साठे यांच्या घरी पाचवा छापा टाकण्यात आला. शिवसेना विभाग संघटक संजय कदम यांच्या घरी सहावा छापा टाकण्यात आला.

Leave a Comment