हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे मोठी चाल खेळत अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी याना उमेदवारी दिली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब (Anil Parab) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर (J M Abhyankar) यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. २६ जून रोजी शिक्षक-पदवीधर निवडणुक होणार आहे.
कोण आहेत अनिल परब –
अनिल परब हे ठाकरे गटातील मोठं नाव आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी अतिशय घनिष्ट असे त्यांचे संबंध आहेत. मातोश्रीचे एकनिष्ठ शिलेदार अशी त्यांची ओळख आहे. अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळली होती. ते रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही होते. अनिल परब हे 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल परब याना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
कोण आहेत ज. मो. अभ्यंकर?
ज. मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. शिक्षकांचे प्रश्न आणि समस्यांवर त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष या पदांची धुरा अभ्यंकर यांनी सांभाळलेली आहे. आता त्यांना ठाकरे गटाने मुंबई शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात निवडणूक होणार आहे. 26 जूनला विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडेल. त्यानंतर 1 जुलै रौजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल