Sunday, April 2, 2023

‘या’ प्राण्याचे मांस खाल्ल्यामुळे पसरला कोरोना व्हायरस ; घ्या जाणून कोणता आहे हा प्राणी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसांपासून चीनसह संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने सळोकी पळो करून सोडले आहे. या आजाराबद्दल नागरिकांमध्ये अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. चीनमधून पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या आजाराची लागण होऊ नये. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे उपाय हे जगभरात केले जात आहेत. पण हा आजार नेमका का पसरला असावा याच्या अनेकजण विचारात असतील. त्यामुळे हा आजार कशामुळे पसरला हे आपण आज जाणून घेणार आहोत.

retuyyu_202002369655

- Advertisement -

एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार मनुष्य प्रजातीमध्ये कोरोना व्हायरस पँगोलिन या प्राण्यापासून पोहोचला आहे. या प्राण्यामुळे कोरोना व्हायरस पसरत असल्याचा दावा केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. पँगोलिन या प्राणाची प्रजात अतिशय दुर्मिळ आहे. हा स्तनधारी वन्यजीव इतर स्तनधारी वन्यजीवांपेक्षा फार वेगळा दिसतो. या प्राण्याचा आकार सुद्धा वेगळा आहे. त्याचा आकारही काहीसा वेगळाच असतो. खजुराच्या झाडावर असणाऱ्या खवलांप्रमाणे या प्राण्याचं शरीरही खवलांच्या एका टणक आवरणाने अच्छादलेलं असतं. दूरून पाहिल्यास हा एखाद्या लहान डायनासॉरप्रमाणे दिसतो. या प्राण्याचे मांस खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरस पसरला आहे, असं या संशोधनातून समोर आहे.

rhtfr_202002369656

हा आजार कोणत्या प्राण्यामुळे होतो. याबाबत अनेक गैरसमज आहेत. सापापासून तर कधी कोंबड्यांपासून कोरोना व्हायरस पसरत असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या. अलिकडच्या काळात वटवाघळामुळे हा आजार पसत असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं होत. पण या अफवांबाबत हा महत्वपूर्ण खूलासा चीनकडून करण्यात आला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.