मराठी भाषिकांसाठी रिल्स स्पर्धेचे आयोजन; अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा भव्य उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दिनांक १ नोव्हेंबर रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा जन्मदिवस आहे. या निमित्ताने यंदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मराठी भाषिक कलाकारांसाठी भव्य रिल्स स्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे. याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संपूर्ण देशभरातील मराठी भाषिक रिल्स निर्मात्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सोबतच या स्पर्धेसाठी काही नियम आणि अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. तर या नियम आणि अटी खालीलप्रमाणे :-

० या स्पर्धेत सहभागी होण्याबाबतचे नियम, अटी व शर्ती
१) सर्व भारतीय नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
२) तयार केलेला व्हिडीओ मराठी भाषेत असावा.
३) व्हिडीओमध्ये पुढील विषय असावेत – चमत्कार विरोधी प्रबोधन, बुवाबाजीबाबत जनजागृती, फलज्योतिषविरोधी जनजागृती, फटाकेमुक्त दिवाळी, छद्मविज्ञान, ग्रहणविषयक अंधश्रद्धांबाबत जनजागृती
४) व्हिडीओ स्वनिर्मित असावा. इतरांच्या व्हिडीओमधील काही भाग घेऊ नये. तसेच copyright कायद्याचे पालन करावे.
५) व्हिडीओ ३० ते ५० सेकंदांचा असावा.
६) व्हिडीओ ओरिएंटेशन portrait असावे.
७) स्पर्धेसाठी आलेल्या सर्व व्हिडीओंच्या प्रकाशन व प्रसारणाचे हक्क महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला असतील.
८) १ डिसेंबर २०२२ नंतर स्पर्धक आपले व्हिडीओ आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर प्रकाशित करू शकतील.
९) २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आपले व्हिडिओ पाठवावेत.
१०) व्हिडिओसोबत स्पर्धेत सहभागी होण्याचा फॉर्म भरून पाठवावा. फॉर्मवरील सर्व रकाने भरून त्यावर सही करावी व फॉर्म स्कॅन करून पाठवावा. फॉर्मशिवाय आलेले व्हिडीओ स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
११) १ नोव्हेंबर २०२२ रोजी स्पर्धेचा निकाल घोषित केला जाईल.
१२) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
१३) आपले व्हिडिओ [email protected] या ईमेल आयडीवर पाठवावेत.
१४) सहभाग फॉर्म https://bit.do/anisreels या लिंकवर उपलब्ध आहे.
१५) सर्व सहभागी स्पर्धकांना सिने क्षेत्रातील मान्यवरांच्या सहीचे सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमधून ३ विजेते आणि २ उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील. यातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास ७००० रु., द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास ५००० रु. आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास ३००० रु. देऊन गौरविण्यात करण्यात येईल. तसेच या विजेत्यांशिवाय दोन उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर केली जातील. या स्पर्धकांना प्रत्येकी २००० रु. देऊन गौरविण्यात येईल.

याशिवाय स्पर्धेसाठी जे विषय दिलेले आहेत त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच एक ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येईल. तसेच त्याची माहिती म.अं.नि.स.च्या फेसबुक पेजवर देण्यात येईल. पेज लिंक पुढीलप्रमाणे – https://www.facebook.com/MaharashtraAns . स्पर्धेबाबत इतर कोणतीही शंका वा प्रश्न असल्याचे अधिक माहितीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सोशल मीडिया विभाजशी संबंधित वाघेश साळुंखे (९९६०६०६०४४) आणि राहुल माने (८२०८१६०१३२) यांच्याशी संपर्क करावा.