महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अविजीत रॉय करेज अवॉर्ड; आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी। शुभम भोकरे

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार करण्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अमेरिकेतील ‘फ्रीडम फ्रॉम रिलीजन फाऊंडेशन’ या संघटनेचा ‘अविजीत रॉय करेज अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. वैज्ञानिक मनोभावना जोपासायला शिकवणाऱ्या महाराष्ट्र अंनिसला यावर्षी ३० वर्षं पूर्ण झाली आहेत. ३० वर्षांत संघटनेने केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.

स्मृती चिन्ह व पाच हजार डॉलर्स असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. १८, १९ आणि २० ऑक्टोबर २०१९ रोजी अमेरिकेतील शिकागोजवळ मेडीसन शहरात होणाऱ्या संस्थेच्या ४२ व्या अधिवेशनात हा पुरस्कार समितीला सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित राहणार आहेत. अंनिसचे हितचिंतक कार्यकर्ते डॉ. श्रेयस भारूळेही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील समविचारी संघटनाच्या भेटीही होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान अंनिसच्या संघटित लढ्याचं हे यश असून अंनिसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या पुरस्काराने लढण्याचं बळ मिळणार असल्याचं अविनाश पाटील म्हणाले. डॉ दाभोळकर यांनी शांततामय मार्गाने लढा उभारण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याचा दिलेला संदेश कार्यकर्ते आजही मनाशी ठामपणे बाळगून आहेत. चळवळीचा नेता गेल्यानंतरही मागील ६ वर्षांत हा लढा जोमाने उभा राहिला त्याचंच बक्षीस आज समितीला मिळत आहे. दाभोळकरांच्या जाण्याचं तीव्र दुःख आहे पण त्यांचा विचार पुढे जात असल्याचा आनंदही आहेच असं अविनाश पाटील पुढे बोलताना म्हणाले.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment