….या कारणामुळे एकनाथ खडसेंची आमदारकी वादाच्या भोवऱ्यात??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकतंच भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी एकनाथ खडसेंचे नाव राष्ट्रवादीकडून पाठवण्यात येणार असल्याची चर्चा सुद्धा आहे. पण खडसेंची ही आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन खडसेंच्या नावाला विरोध केला आहे.

राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी एकनाथ खडसे यांचे नाव पाठवण्यात आले आहे. 1 नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भेट घेतली आणि एकनाथ खडसे यांच्या नावाला त्यांनी विरोध केला. यादीत खडसेंचे नाव येणे हे संतापजनक आहे. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर आहे. पुन्हा एकदा राजकारणात भ्रष्टाचारी नेत्याला आणले जात आहे. जर खडसे हे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले, तर भ्रष्टाचाराविरोधी लढ्याला काही अर्थ राहणार नसल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर पोलिसांत एकनाथ खडसे यांच्याविरोधात तक्रार केली होती, पण कोणताही गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात न आल्यामुळे न्यायालयात आणखी लढा द्यावा लागणार आहे. आपण खडसे यांच्याविरोधात आणखी पुरावे गोळा करुन ते राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचेही दमानिया यांनी सांगितले.

तसेच एकनाथ खडसे जे भाषा वापरतायेत त्याबद्दल मी राज्यपालांना निवेदन दिलं आहे. राष्ट्रवादी प्रवेशावेळी जे शब्द वापरले “बाई दिली नाही तर मागे लावली” असं विधान शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि सुप्रिया सुळे असताना असं केले गेले. एकनाथ खडसेंना काही लाज आहे की नाही?, त्यांच्या या विधानानंतर मी शरद पवार, सुप्रिया सुळेंना मेसेज केला, शरद पवारांचा मला फोन आला खडसेंनी तुमचं नाव घेतलं नाही असं डिफेन्ड केले, पण माझं सोडा, पण कोणत्याही बाईबद्दल असं विधान करणं हे योग्य वाटतं का? असा सवाल मी शरद पवारांना केल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment