छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर? त्या पोस्टमुळे राजकीय खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला ओबीसीमधून मराठा आरक्षण द्या अशी मागणी केल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी समाजासाठी उभं राहत मराठासमाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये असं म्हंटल. यानंतर राज्यात मनोज जरांगे पतीला विरुद्व छगन भुजबळ वाद चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळालं. अजूनही दोन्ही नेते एकमेकांचा समाजाची बाजू परखडपणे मांडत असून महाराष्ट्रात आरक्षणावरुन मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होत आहे. त्याच दरम्यान, प्रसिद्ध समाजसेविका अंजली दमानिया (Anjali Damania Tweet) यांनी केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली आहे.

अंजली दमानिया यांनी X अकाउंट वरून एक पोस्ट शेअर करत म्हंटल कि, भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप असा सवाल करत दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्यासहित भाजपला घेरलं आहे. अंजली दमानिया यांनी यापूर्वी सुद्धा भ्रष्टाराचारावरून छगन भुजबळ याना लक्ष्य केलं होते. आता त्यांच्या या ट्विटवर स्वतः छगन भुजबळ नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे आता पाहावं लागेल.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा छगन भुजबळ यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करून मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा.भुजबळांमध्ये जर जातीवाद शिरला असेल तर ते मंत्रीपदावर राहायच्या लायकीचे नाहीत. त्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवा अशी थेट मागणी संजय गायकवाड यांनी केली होती.