मोठी बातमी!! विधानसभा उपाध्यक्षपदी आण्णा बनसोडे यांची बिनविरोधी निवड

Anna Bansode
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्याच्या विधिमंडळात विधानसभा उपाध्यक्ष (Assembly Vice President) पदासाठी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आण्णा बनसोडे (Anna Bansode) यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांना उपाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवण्यात आले.

विरोधकांनी उमेदवारी अर्ज दिला नाही

विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली असली, तरी या पदासाठी कोणत्याही विरोधी पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे एकमेव उमेदवार म्हणून आण्णा बनसोडे यांची निवड बिनविरोध झाली. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आण्णा बनसोडे यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अनुमोदन दिले. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर अण्णा बनसोडे यांना बंदरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, आण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून देखील काम करण्याचा मोठा अनुभव आहे. आता ते विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. महत्वाचे म्हणजे, राज्याच्या सत्तेत विधानसभेचे अध्यक्षपद आणि विधानपरिषद सभापती पद भाजपकडे गेले आहे. तर विधान परिषदेचे उपसभापती पद शिंदे गटाकडे आहे. आता विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीकडे आले आहे.