BREAKING NEWS : अण्णा हजारे रुबी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट

पुणे : समाजसेवक अण्णा हजारे यांना रुबी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे. अशक्तपणा जाणवायला लागल्याने आज सकाळी हजारे यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप यावर कोणतीही माहिती मिळाली नसून रुटीन चेकअप करता हजर रुग्णालयात आल्याचं बोललं जात आहे.

अण्ना हजारे यांच्यावर एन्जोग्राफी करण्यात आल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी हजारे यांना आराम करण्याचा सल्ला दिला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हजारे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा दर्शवला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली होती. हजारे प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होणार नसले तरी आंदोलन तीव्र करण्यासंबंधी काही सूचना त्यांनी शिष्टमंडळाला केल्या होत्या.

You might also like