तुमच्या मंत्र्यांच्या भ्रष्ट्राचाराचे डिटेल्स माझ्याकडे ; अण्णांचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आणि अण्णा हजारे यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. अण्णा हजारे यांनी केंद्र सरकार विरोधातील उपोषण मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातुन अण्णा हजारे यांच्यावर तोफ डागताना त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर अण्णांनी प्रत्युत्तर देताना शिवसेनेलाच निर्वाणीचा इशारा दिला आहे.

आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. आमच्यापुढे फक्त समाज आणि देश आहे. ज्या वेळी समाज आणि देशासाठी घातक असणारे कृत्य होत असते. त्यावेळी आम्ही आंदोलन करतो. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल,” असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेला दिला.

तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल,” असं अण्णा म्हणाले. तसेच, भाजप सत्तेवर आल्यानंतर माझे एकूण 6 आंदोलनं झाली, हे आंदोलन आपण विसरलात का?,” असा प्रतिप्रश्नही त्यांनी शिवसेनेला केला.

 काय लिहिलं होते सामना अग्रलेखात  –

अण्णांनी उपोषणाचं अस्त्र बाहेर काढायचं आणि नंतर ते म्यान करायचं असं यापूर्वीही घडलं आहे. त्यामुळं आताही ते घडलं तर त्यात अनपेक्षित असं काही नाही. भाजप नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळं अण्णांचं समाधान झालं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मूळ प्रश्न कृषी कायद्याची दहशत आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील दडपशाहीचा आहे. या संदर्भात अण्णा निर्णायक भूमिका घेत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र अण्णांनी उपोषण मागं घेतलं आहे. त्यामुळं कृषी कायद्यांबाबत त्यांची नेमकी भूमिका काय हे तूर्त तरी अस्पष्टच आहे,’ अण्णा नक्की कोणाच्या बाजूने आहेत हे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या अस शिवसेनेने म्हंटल होत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like