नांदेड प्रतिनिधी
नांदेड | दिनांक ६ ऑगस्ट रोजी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया तालुका कमिटी तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांची ९८ वी जयंती नांदेड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या जीवणावर जाहिर व्याख्यान ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एकलारे सर होते तर प्रमुख वक्ते म्हणुन प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले लाभले होते.
‘आण्णाभाऊंचे विचार समाजापर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे. आण्णाभाऊ हे कुणा एका समाजाचे नसुन ते जनतेचे लोकशाहीर आहेत’ असे प्रतिपादन प्रा इंगोले यांनी केले. यावेळी एस.एफ.आय. चे माजी जिल्हा अध्यक्ष शिवाजी गेडेवाड, अंनिसच्या मेघाताई गऊळकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय लोहबंदे, जिल्हा कमिटी सदस्य शंकर बादावाड, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे महाविद्यालयाचे शिक्षक बालाजी लंगेवाड आदी उपस्थित होते.