अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ : सातारा जिल्ह्यात वर्षभरात 4 कोटी 38 लाखांचा व्याज परतावा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सातारा जिल्हयातील लाभार्थ्यांच्या मागे लाँकडाऊन मध्ये ही खंबीरपणे उभे असून गत एका वर्षात 4 कोटी 38 लाख व्याज परतावा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. आतापर्यंत 1 हजार 554 लाभार्थ्यांना 120 कोटी 34 लाख रुपयांच कर्ज वाटप व लाभार्थ्यांना एकूण 6 कोटी 38 लाख रुपयांचा व्याज परतावा जमा झाला आहे. जिल्हयात जवळपास 110 विविध व्यवसायांना कर्ज मंजूर झाले असल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक राहुल यादव यांनी दिली.

यामध्ये शेतीपूरक कुकुटपालन, शेळीपालन, गाय म्हैस पालन, दुध डेअरी तसेच हाँटेल, मेडिकल, किराणा, अँटोमोबाईल, पेपर कप बनविने, काजू प्रक्रिया, कापडी पिशवी बनविने ,कृषी पर्यटन, वहान व्यवसाय अशा अनेक उद्योग उभारले आहेत व जिल्हयात अनेक नव उद्योजक तयार होत आहेत. महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील प्रत्येक तळागाळातील मराठा युवकाला या योजनेतून कर्ज मिळाव. यासाठी सातत्याने बँकांकडे पाठपुरावा करून अनेक नव उद्योजक घडवत असल्याचे दिसते आहे. व्याज परतावा योजनेला सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसुन येत आहे.

या योजनेअंतर्गत आर्थिक पाठबळ मिळवून अनेक नवउद्योजक घडत आहेत. यासाठी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, आकाश मोरे, सोमनाथ आहेर व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक संचालक सचिन जाधव यांचे मार्गदर्शन मिळते .तरी जास्तीत जास्त मराठा बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन महामंडळाच्या वतीने राहुल यादव केले आहे. यावेळी समन्वयक मयूर घोरपडे, शुभांगी जाधव उपस्थित होते .

Leave a Comment