हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या महाराष्ट्रात अंनिस चळवळ मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अंनिस चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, संपादक प्रा. प. रा. आर्डे (Prof.P.R. Arde) यांच्या रूपाने चळवळीला दुसरा धक्का बसला आहे.
अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, संपादक प्रा. प. रा. आर्डे (Prof.P.R. Arde) यांचे आज पहाटे निधन झाले आहे. प्रा. प. रा. आर्डे (Prof.P.R. Arde) हे अंनिसच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सोबत धडाडीने कार्य करणारे कार्यकर्ते होते. ज्येष्ठ कार्यकर्ते आणि संपादक आर्डे (Prof.P.R. Arde) यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन वृत्तपत्राचे तब्बल 20 वर्षे संपादक पद भूषविले आहे.
तसेच ते विज्ञानाचे अभ्यासक तसेच सुप्रसिद्ध वक्ते देखिल होते. प्रा. प. रा. आर्डे (Prof.P.R. Arde) यांच्या अचानक जाण्याने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आधारवड हरवला असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!