अश्विनी वैष्णव यांची घोषणा, भारतात विकसित झालेल्या BSNL च्या 4G नेटवर्कद्वारे केला गेला पहिला फोन कॉल

नवी दिल्ली । केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी BSNL च्या 4G नेटवर्कवरून पहिला फोन केल्याची घोषणा केली आहे. मंत्री म्हणाले की,” हे नेटवर्क भारतातच बनवले आणि डिझाइन केले गेले आहे.” वैष्णव म्हणाले की,”पंतप्रधान मोदींचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होत आहे.”

केंद्रीय मंत्र्यांनी ट्विट करून कॉलची माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “BSNL चे 4G नेटवर्क जे भारतात बनले आहे, त्यावरून पहिला कॉल केला.”

दूरसंचार क्षेत्रात 100 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता
अलीकडेच, सरकारने दूरसंचार क्षेत्रात 100% FDI ला मंजुरी दिली आहे. याशिवाय, दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रम शुल्क आणि AGR पेमेंटवर 4 वर्षांचा मोरॅटोरियम देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पत्रकार परिषदेत याची घोषणा करताना अश्विनी वैष्णव म्हणाले की,”दूरसंचार क्षेत्राच्या ऑटोमेटिक रूटमध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने एकूण 9 स्ट्रक्चरल रिफॉर्मना मंजुरी दिली आहे. याशिवाय 5 प्रोसेस रिफॉर्मना मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय टेलिकॉम कंपन्यांना एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू अर्थात AGR पेमेंटवर 4 वर्षांची सवलत देखील मिळेल.