राज्यात शिक्षक भरती जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होणार आहे. शालेय शिक्षण विभागातील शिक्षक भरतीची चर्चा बराच काळ सुरू होती. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरती संदर्भात माहिती दिली आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची ही जाहीरात पवित्र वेब पोर्टलवर नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पवित्र पेार्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे. ५००० च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या होत्या.

आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात १०,००१ इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी अनुसूचित जातींसाठी १७०४, अनुसूचित जमातींसाठी २१४७, अनुसूचित जमाती- ५२५, व्हि.जे.ए.- ४०७, एन.टि.बी.- २४०, एन.टी.सी- २४०, एन.टी.डी.- १९९, इमाव- १७१२, इ.डब्ल्यू.एस- ५४०, एस.बी.सी.- २०९, एस.ई.बी.सी.- ११५४, सर्व साधारण- ९२४ या संवर्गातील जागांचा समावेश असणार आहे. शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबले जाण्याची आशा व्यक्त होत आहे. २ मार्च २०१९ रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे, आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.

 

इतर महत्वाचे –

म्हणून विधीमंडळाच्या अधिवेशनाला स्थगिती …

‘या’ कारणामुळे आज मंत्रालयासमोर कर्णबधिर तरुणांचे आंदोलन

भारतीय वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता – परराष्ट्र मंत्रालय

Leave a Comment