युक्रेनमध्ये दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | युक्रेनची राजधानी किव्ह एकीकडे रशियाच्या निशाण्यावर आहे तर दुसरीकडे किव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. अशात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.

युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू असा असून चंदन जिंदाल असे या 22 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा पंजाबमधील बर्नाला या ठिकाणचा आहे. इस्केमिक स्ट्रोकच्या आजारामुळे चंदन जिंदालवर विनिस्टीयामधील इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

नवीन जिंदालच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहून आपल्या मुलाचे शव भारतात आणले जावे अशी विनंती केली आहे. युक्रेनमधील खारकिव्हमध्ये रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात कर्नाटकमधील नवीन शेखराप्पा या विद्यार्थ्याचे मंगळवारी निधन झाले होते. त्यानंतर आज दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचे निधन झाल्याने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

रशियन सैनिकांनी युक्रेनमधील खारकीव्ह शहरात गोळीबार केला होता. यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकातील रहिवासी आहे. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी कुटुंबीयांनी सरकारला विनंती केली असून सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या पंजाबी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment