श्रद्धा सारखी अजून 1 हत्या; प्रियकराने प्रेयसीचे तुकडे केले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा वालकर हत्या प्रकाराने संपूर्ण भारताला हादरा बसला असतानाच आता अशाच प्रकारची क्रूर घटना बांगलादेश मध्ये घडली आहे. एका मुस्लिम तरुणाने आपल्या हिंदू प्रेयसीची हत्या करून तिचे ३ तुकडे केले. पोलिसांनी तात्काळ या नराधमाला ताब्यात घेतलं आहे. अबू बकर असं सदर आरोपीचे नाव असून मृत तरुणीचे नाव कविता रानी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कविता आणि अबू रिलेशनमध्ये होते. परंतु अबूचे यापूर्वीच सपना नावाच्या मुलीसोबत लग्न झाल्याचे कविताला माहीत नव्हते. अबूने कधी तिला हे सांगितलेही नाही. अबूने आपली फसवणूक केल्याचे कविताला समजताच तिने याला विरोध केला. यानंतर दोघांमध्ये रोज भांडणे सुरू झाली. यानंतर अबूने कविताला आपल्या मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला.
https://twitter.com/VoiceOfHindu71/status/1592791908468031489?s=20&t=ryjOtZt5Y2AIlvdf-GNHJA
शनिवारी 5 नोव्हेंबर 2022 रोजी अबूची पत्नी कामावर गेल्यावर अबूने कविताला त्याच्या घरी बोलवलं . यावेळी दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कविता जोरात बोलली तेव्हा अबू बकरने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने स्वयंपाकघरातून धारदार चाकू आणून प्रथम डोके कापले, नंतर शरीराचे तीन तुकडे करून पिशवीत ठेवले. नंतर ते नाल्यात फेकले.
कविताची हत्या केल्यांनतर त्याच रात्री (5 नोव्हेंबर 2022) अबू बकर त्याची तथाकथित पत्नी सपनासोबत ढाक्याला रवाना झाला. पोलिसांनी तसेच RAB इंटेलिजन्सने 6 नोव्हेंबर 2022 च्या रात्री अबू बकरचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर, त्याला आणि सपनाला गाझीपूर जिल्ह्यातील बासन पोलीस स्टेशन हद्दीतील चौरस्ता परिसरातून अटक करण्यात आली.